Breaking News

24 तासात मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद


परळी शहर डी.बी पथकाची दबंग कामगिरी !

परळी :  औरंगाबाद येथील प्लास्टिक चा व्यापार करणारे होलसेल व्यापारी संजय गंगवाल परळी शहरात आले असता त्यांच्यावर औरंगाबाद येथील चोरांनी तीन दिवस पाळत ठेवून परळी शहरात सदर व्यापारी यांच्या चार चाकी गाडीतील रोख रक्कम 24, लाख 8 हजार  रूपये घेवून पोबारा केला होता.ही घटना काल दि.12 ऑक्टोबर 2020 रोजी परळी शहरातील मोंढा मार्केट जवळ घडली होती.   गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत दोन  आरोपी ला कार व मुद्देमालासह अटक करण्यात परळी शहर डी.बी ला यश आले आहे. परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परळी डी. बी.पथकाने ही कामगिरी केली.

   सविस्तर वृत असे की , फिर्यादीने शहर पोलीस स्टेशनला येवून फिर्याद दिली की, औरंगाबाद येथील संजय प्लास्टिक होलसेल दुकान चालवत असून मी संपूर्ण मराठवाड्यात प्लास्टिक चा होलसेल माल देत असून मी माझी  वसूली करून मोंढा भागात उभी केली असता माझ्या क्रेटा गाडीतील  बँग मधील रोख रक्कम 24 लाख 8 रूपये घेवून पळून गेलेले चोरटे  यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा नंबर 311/20 कलम  379 नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला .गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या 24 तासांच्या आत दोन  आरोपी ला कार व मुद्देमालासह अटक करण्यात परळी शहर डी.बी ला यश आले असून परळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  डी बी पथकाचे पोलीस जमादार भास्कर  केंद्रे, सुंदर केंद्रे ,शंकर बुड्डे, गोविंद भताने, हानूमान मुंडे यांनी पाठलाग करुन वैजापूर परिसरातून  दोन आरोपीस चोरी करण्यासाठी वापरलेली कार व रोख रक्कम  मुद्देमालासह ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात हे करीत आहेत.No comments