Breaking News

मुप्टाचे क्रांतीबा जोतिबा फुले 2020 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित


 

 बीड :  महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनच्या (मुप्टा) वतीने देण्यात येणा·या सन 2020 च्या क्रांतीबा जोतीबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी प्रा. राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तुलसी इंग्लिश स्कुल, बीड येथे संपन्न झाली. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त निवड समितीच्या बौठकीत समितीचे सदस्य प्रा.विनोद किर्दक , प्रा. नामदेव शिनगारे, मा. शरद मगर, मा. श्रीकांत वारभूवन, मा. प्रविण तरकसे, प्रा. संजय बागुल आदींच्या उपस्थितीत  करण्यात आल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे मुप्टाचे बीड कार्याध्यक्ष प्रा.राम गायकवाड यांनी दिली. 

    

शिक्षक, प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव लढाऊ  संघटना म्हणून मुप्टाने आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून संघटनेने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमित्त 125 प्रबोधनपर व्याख्याने घेण्यात आली.जगावरती कोव्हीड-19 च्या विषाणू महामारीमध्ये बीड मुप्टा संघटनेतर्फे गोर-गरीब, मजुर, गरजु परिवारांना 3 लाख 50 हजार रुपयांची  किराणा किट वाटप करण्यात आली. तसेच वडवणी तालुक्यातील खडकी देवळा जि.बीड येथील चि.सचिन बाबुराव कांबळे या युवकाची मेलबर्न विद्यापीठ आस्ट्रेलिया येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली असल्याने व त्याची  आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने बीड जिल्हा मुप्टाच्या वतीने 50 हजार रुपये मदत करण्यात आली व सामाजिक आरोग्य लक्षात घेवून मास्क, स्ॉनिटायझर वाटप करुन आरोग्य विषय जागृती करण्यात आली.

    

प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी महात्मा फुले स्मृतिदिनाचे औचित्य साधून मुप्टाच्या वतीने सलग 12 व्या वर्षी साहित्य,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा·या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख व वेळ लवकरच पत्राद्वारे तसेच संपर्क करुन कळविण्यात येईल.

   

पुरस्कारार्थी े:- 1. प्रा.डॉ. प्रेमचंद सिरसट (सौ.के.एस.के. महाविद्यालय,बीड) ,2. आयु. बंकटी सोपान अंजान (कै. केशवरावजी धांडे मतीमंद निवासी विद्यालय,तलवाडा ता.गेवराई),3. सौ.  रजनी कैलास लगड (रामतिर्थ हायस्कुल,बीड), 4. प्रा. डॉ.  सुनिल आहिरराव (श्री.शिवाजी महाविद्यालय,परभणी) 5. आयु. भारत नानाभाऊ घागरमाळे ( जि.प.प्रशाला,परळी) 6. आयु. श्रावण देवगिर गिरी (प्राचार्य , छत्रपती पब्लीक स्कुल, कुळधरण ता.कर्जत जि.अ.नगर) 7. आयु. अंबादास प्रितम ढोके (कै. देवराव पाटील मा. निवासी आश्रमशाळा,औरंगाबाद),8. आयु. संजीव पुंडलिक वाघमारे ( जि.प.प्रा.शाळा राणी सावरगाव ता.गंगाखेड जि.परभणी), 9. प्रा. डॉ. दुष्यंत मनोहर कटारे ( कै. व्यकंटराव देशमुख महाविद्यालय, बाबळगाव),10. आयु. रझिओद्दीन रसिओद्दिन इनामदार(न्ॉशनल उर्दु हायस्कुल,बीड),11. आयु. सुभाष उत्तमराव भादवे (केंद्रीय मुख्याध्यापक जि.प. प्रा.शाळा खिळद ता.आष्टी जि.बीड), 12. आयु.शंकर गंगाराम  गायकवाड (कै. प्रेमलाबाई इनामदार प्रा.शाळा कुंडाळवाडी ता.बिलोली जि.नांदेड), 13. आयु. सिताराम राघोजी इचनर ( पवित्रेश्वर विद्यालय.हिंगोली)14. प्रा.डॉ. मिना निवृत्ती पवार ( कला महाविद्यालय, आभोणा ता.सटाणा जि.नाशिक) 15. प्रा.डॉ.बालाजी सुर्यवंशी   (पाटकर कॉलेज, गोरेगाव मुंबई)

   

तरी योग्य वेळी पुरस्कार सोहळयासाठी शिक्षणप्रेमी आणि समाजातील सर्वच घटकांनी व पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी सहकुटंूब उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हासचिव प्रा.राम गव्हाणे, शरद मगर, श्रीकांत वारभुवन, डॉ. संजय कांबळे, तरकसे प्रविण यांनी केले.


No comments