Breaking News

चालत्या टेम्पोतून ताडपत्री फाडून सोयाबीनचे 12 कट्टे चोरट्याने लांबविले

केज पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल 

गौतम बचुटे । केज 

चालत्या टेम्पोच्या पाठी मागील बाजूने ताडपत्री फाडून त्यातील सोयाबीनचे १२ कट्टे  एकूण ३० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना चिंचोली माळी ते केज रस्त्यादरम्यान घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबतची माहिती अशी की,  दि.९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १०:३० ते ११:०० वा. केज तालुक्यातील चिंचोली माळी ते केज रोड दरम्यान दरम्यान प्रदीप संजय गपाट रा. नांदूरघाट हे त्यांच्या टेंपोतून सोयाबीन विक्रीसाठी घेवुन जात असताना चालत्या टेम्पोवर कोणी तरी अज्ञात इसमाने चढून ताडपत्री कापून आतील ३० हजार रु. चे १२ कट्टे सोयाबीन चोरून नेले. सदर चोरी बाबत वाहन चालक प्रदीप गपाट यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. ४८१/२०२० भा. दं. वि. ३७९ नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

तपासी अधिकारी 
पोना. अमोल गायकवाड
 
No comments