Breaking News

जागृती मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त सभासदांना 12 टक्के व्याजदराने होणार कर्जपुरवठा : प्रा. गंगाधर शेळकेपरळी : तालुका व शहराच्या आर्थिक पटलावरती नावलौकिक असणाऱ्या व आर्थिक क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या जागृती ग्रुपच्या जागृती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने 9/11/20 रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सभासदांसाठी आगामी महिनाभरा करिता संस्थेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सर्व कर्ज योजनांचा 12% एवढ्या आकर्षक व नाममात्र व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येणार असून या सुवर्ण संधीचा अधिकाधिक सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन जागृती ग्रुपचे सर्वेसर्वा तथा जागृती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सहकाररत्न प्रा. गंगाधर शेळके सर यांनी केले आहे.

       

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात तसेच परळी तालुका व शहराच्या आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावरती असणाऱ्या जागृती ग्रुपच्या जागृती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेची स्थापना दि 9/ 11/ 11 या साली करण्यात आली होती. स्थापनेपासून आजतागायत ही संस्था यशाची अनेकानेक शिखरे पदांक्रत करत आज मितीस यशस्वीरित्या दहाव्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. संस्थेचा आज दि 9/ 11/ 20 रोजी वर्धापन दिन अतिशय उल्हासात साजरा होतो आहे. 2011 साली लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत असून संस्थेच्या राज्यामध्ये व इतर राज्यात मिळून जवळपास 20 शाखा यशस्वीरित्या कार्यरत आहेत. व्यवस्थापनाच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्थेचे अध्यक्ष प्रा गंगाधर शेळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांसाठी आगामी महिनाभरासाठी एका आकर्षक योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदरील योजनेनुसार 9/ 11/ 20 ते 9/ 12/ 20 या एक महिन्याच्या कालावधीदरम्यान संस्थेच्या जवळपास 20 शाखांमध्ये कॅश क्रेडीट कर्ज,पगार तारण कर्ज,वाहन तारण कर्ज, सोने तारण कर्ज, गृहकर्ज, एलआयसी तारण कर्ज, माल तारण कर्ज आधी विविध कर्ज योजनांचा केवळ 12% एवढ्या नाममात्र व आकर्षक व्याजदराने सभासदांना कर्जपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.    

        

जागृती ग्रुप नेहमीच हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी आशेचा किरण असून जागृती ग्रुपच्या वतीने होईल ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो. तरी जागृती मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर केलेल्या कमी व्याजदराने कर्जपुरवठा या आकर्षक योजनेचा तथा सुवर्णसंधीचा लाभ सर्व सभासदांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा असे आवाहन जागृती ग्रुपचे सर्वेसर्वा व जागृती मल्टीस्टेट चे अध्यक्ष सहकाररत्न प्रा गंगाधर शेळके सर यांच्यासह उपाध्यक्ष प्रा. सौ शोभाताई शेळके, कोषाध्यक्ष सुभाष नानेकर, सचिव वसंत सूर्यवंशी व संचालक मंडळ सर्व श्री राहुल शेळके, प्रल्हाद सावंत, सुरेश बनसोडे म. अरेफोद्दीन तांबोळी सौ शिल्पा रोडगे आदींच्या वतीने करण्यात आले असून सर्व सभासद ठेवीदार व हितचिंतकांना दीपावलीच्या निमित्ताने शुभेच्छा ही यावेळी अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.No comments