Breaking News

केजमध्ये जन 'सेवा'ने जपले वृत्त ..! मेंदूच्या क्षयरोगाने पीडित मुलाला उपचारासाठी केली 11101 आर्थिक मदत

 

केज : गोरगरिबांसह अनाथ मुलांच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्या केजच्या सेवा संघ ग्रुपने अविरतपणे जनसेवेचे वृत्त जोपासल्याचे दिसत आहे. कोरोना काळात धान्य वाटप करून अनेकांना आधार देण्याचा काम केलं तर रक्तदान शिबीरे घेऊन अनेकांचे जीवन फुलविण्याचे काम केले. मेंदूच्या क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या प्रशांत वरपेला उपचारासाठी 11101 आर्थिक मदत मौलाची मदत केली. 

केजमध्ये कार्यरत असलेल्या सेवा संघ ग्रुपने  सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून हाती घेतल्यानंतर जिथं कोणी नाही, तिथं सेवा संघ गरजूंच्या मदतीला धावून जातो, अशी चर्चा सध्या केजकरांमध्ये होत आहे. सामाजिक ऋणाची परतफेडीची भावना जोपासत ती इतरांमध्ये जागृती करून अडचणीत असलेल्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याचं आणि प्रसंगी त्यांना आर्थिक बळ देण्याचं काम सेवा संघ करत आहे. 

समाजातील काही दानशूर लोकांच्या मदतीने निधी उभारून, ती मदत गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम सेवा संघ प्रामाणिकरित्या करत आहे. कोरोना काळात धान्य वाटप करून अनेकांना आधार देण्याचं काम सेवा संघाने केलं तर वेळोवेळी रतक्तदान शिबीर घेवून अनेकांचे जीवन फुलविण्याचे काम केले. शिवाय  अनाथ मुलांसाठी निधी उपलब्ध करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. त्यातच साळेगाव येथील इयत्ता दहावीतील प्रशांत कैलास वरपे हा मेंदूच्या क्षयरोगाने पीडित असून त्याच्या उपचारासाठी आई - वडिलांची आर्थिक परिस्थिती नसून ते हतबल झाल्याची माहिती मिळताच प्रशांतला उपचारासाठी 11101 रुपयांचा निधी जमा करुन त्याला ती मदत करण्यात आली.  ही आर्थिक मदत केज येथील प्रसिद्ध व्यापारी गिरीश मशनरी व सतिष मशनरीचे मालक कोटेचा बंधू, शिक्षक श्री सोन्नर, श्री गोरे, श्री आठरे, श्री सोनवणे विलास, श्री चाटे, श्री आखाडे, श्री थोरात, श्रीमाने, श्री देशमुख, श्री. धवलशंख, श्री दोरगे,  दिनकर राऊत, श्री खोगरे, अशोक पांचाळ यांनी यांनी सहकार्य केले. 


No comments