Breaking News

पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल- मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार

बीड : पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल पुढील प्रमाणे आहे.  

 1) भगवान विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००३ (इ,. १०वी.) ऐवजी भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड,  बीड. ( भगवान विद्यालय,धानोरा रोड बीड समोर) 

2) चंपावती विद्यालय, बीड  केंद्र क्रमांक २००० (इ,. १०वी.) ऐवजी चंपावती इंग्लिश स्कुल, बीड (चंपावती विद्यालय, बीड शेजारी) 

 3) बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक २०९ (इ,. १२वी.) ऐवजी मिल्लिया कन्या शाळा,किल्ला मैदान, बीड ( बलभीम महाविद्यालय शेजारी) 

 4) श्री सिध्देश्‍वर विद्यालय, माजलगाव केंद्र क्रमांक २५०२ (इ,. १०वी.) ऐवजी सिध्देश्‍वर महाविद्यालय, माजलगाव ( श्री सिध्देश्‍वर विद्यालय शेजारी ,)

 5) न्यू हायस्कूल थर्मल, परळी वै  केंद्र क्रमांक २१४६ (इ,. १०वी.)ऐवजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी ( न्यू हायस्कूल शेजारी) 

6) जि.प. मा.शाळा शिरूर कासार केंद्र क्रमांक २६२५ (इ,. १०वी.) ऐवजी जि.प. कन्या शाळा, शिरूर (का.) ( जि.प. मा.शाळा शेजारी) 

या बदला नुसार आणि बदल झाल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षार्थींनी हा बदल केवळ दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग-1 आणि बारावीच्या गणित व संख्याशास्त्र भाग-2 या पेपर पुरताच आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे.


No comments