Breaking News

एटीएम कार्डची अदला बदल करून 1 लाख 60 हजार रुपयाला लावला चुना !

 


अज्ञात भामटया विरोधात केेेज पोलिसात गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज   

येथील एसबीआय शाखेच्या एटीएम वरून एका भामटयाने अज्ञात एटीएम कार्डची अदला-बदल करून त्यातून वेगवेगळ्या मार्गाने १ लाख ६० हजार रुपये काढल्याचा प्रकार घडला. ही बाब लक्षात येताच याप्रकरणी त्या भामटया विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, श्रीहरी शिवदास मुंडे रा.शिरपुरा ता. केज यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३:४५ वा. सुमारास केज येथील कळंब रोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएम मधुन दोनदा प्रत्येकी दहा- दहा हजार रुपये काढले. त्या वेळेस ते पैसे मोजून घेत असताना त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या अनोळखी इसमाने कार्डचे अदला बदल केली. त्या ठिकाणी अन्य ज्यावर पांडुरंग सरडे नाव असलेले एटीएम कार्ड त्या ठिकाणी ठेवून त्याची अदलाबदल केली. नंतर त्या अनोळखी इसमाने श्रीहरी मुंडे यांचे एटीएम कार्ड वापरून प्रथम शंभर रुपये काढले. नंतर बीड येथील पेट्रोल पंपावर तसेच विविध ठीकाणी आणि त्याद्वारे पैसे खात्यावर ट्रान्सफर करून त्याने एकूण त्यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये काढले आहेत.

या बाबत श्रीहरी मुंडे यांना दि.७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येताच त्यांनी बँकेशी संपर्क साधून खाते बंद केले. नंतर या प्रकरणी केज पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध फिर्याद दिली. 

त्या नुसार केज पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.पोहेकॉ रुक्मिणी पाचपिंडे


No comments