Breaking News

Mpsc संदर्भात निर्णय विध्यार्थ्यांना न्याय देणारा - राजेंद्र आमटे

शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री यांचे जाहीर आभार बीड :  मराठा आरक्षणाचा स्थगिती च्या पार्श्वभूमीवर व राज्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मा.आ. विनायकराव मेटे साहेब यांनी मराठा समाजाच्या विध्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ mpsc परीक्षेत घेता येणार नाही मराठा समाजातील विध्यार्थ्यांनचे नुकसान होईल हे मराठा समाजाचे नुकसान सरकारने होऊ देऊ नये. मराठा समाजातील विध्यार्थ्यांना परीक्षेत आरक्षण स्थगिती मुळे अनेक विद्यार्थीचे नुकसान होणार होते अशी मागणी आ. विनायकराव मेटे साहेब यांनी वारंवार मुख्यमंत्री यांच्या कडे केली. 


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी कोणत्याही विध्यार्थ्यांनचे नुकसान होणार नाही व कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी घेतला आहे हा निर्माण मराठा समाजातील अभ्यासू विध्यार्थ्यांना न्याय देणारा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, सरचिटणीस प्रशांत डोरले, उपाध्यक्ष अक्षय माने, उपाध्यक्ष विलास मस्के, सौरभ तांबे, हरीश शिंदे, विजय डोके, अक्षय शिंदे, शरद तिपले, दादा घोरड, घोडके पांडुरंग, लाटे तात्यासाहेब, मोहन गव्हाणे, संपत गव्हाणे, सुधाकर काकडे, संजय तिपले, बाळू शेळके, केशव अबुज आदींच्या वतीने निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. 

 No comments