महिला महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
परळी : आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सरस्वतीचे यथार्थ उपासक भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे. परळीकर यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात या महापुरुषाला वंदन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख सर यांच्या हस्ते डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतर उपस्थितांनी ही त्यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून वंदन केले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारतीय जनमानसावर आपल्या विद्वत्तेने व त्यागाने मोहिनी घातली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामी मोलाचं योगदान असणारे आणि जीवनांतापर्यंत जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या या महापुरुषाच्या जीवनाचा व त्यांच्या महान कार्याचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.
प्रस्तुतप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संयोजक प्रा.डॉ. पी. व्ही. गुट्टेसर यांनी सूत्रसंचालन केले तर राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागाचे संयोजक प्रा. प्रवीण फुटकेसर यांनी आभार मानले . याप्रसंगी डॉ. जोशी सर, डॉ. यल्लावाडसर डॉ. वर्षा मुंडे मॅडम, प्रा.आरती शहाणे, प्रा. के. बी. देशपांडेमॅडम प्रा.कोकाटसर , प्रा.अशोक पवार , प्रा.विशाल पौळ श्री प्रमोद पत्की व श्री.विकास देशपांडे उपस्थित होते.
No comments