औरंगाबाद डेपोला शिरूर कासार करांची अलर्जी!
बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र बंद असलेल्या एसटी महामंडळ डेपो काही तांत्रिक सुविधा देऊन सर्वत्र सुरू करण्यात आले आहेत यामध्ये औरंगाबाद पैठण बोधेगाव शिरूर कासार येथील मुक्कामी गाडी काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली होती परंतु पैठण डेपोच्या आगार प्रमुखाच्या मनमौजी मुळे अद्याप ती सुरू करण्यात आली नाही त्यामुळे त्यांना शिरूर कासार ची अलर्जी आहे काय ? असे जनतेतून ऐकण्यास मिळत आहे.
अगोदर डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाचे वागणे सध्या बदलेले नसल्याने वरचेवर या महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे काही मोठ्या अर्निग च्या गाड्या सुरू झाल्याने कुठेतरी कसाबसा व्यवहार सुरळीत होत आहेत चांगली अर्निंग देणारी गाडी पैठण शिरूर कासार तिला एकादशी इतर सर्व वाऱ्यामुळे चांगले अर्निंग मिळते परंतु पैठण आगार प्रमुख तरोडे यांच्या मनमानी कारभारामुळे ही गाडी अद्याप बंद आहे तेव्हा जिल्हा विभागीय कार्यालयाने या बाबीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ही एसटी बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
ही बस सुरू झाल्यानंतर या भागातील कंडक्टर व ड्रायव्हर यांच्या सोयीनुसार चालविल्यास जास्तीत जास्त अर्निंग मिळून महामंडळाला नफा होणार आहे तेव्हा या भागातील वारकरी प्रवासी आणि व्यवसायिकांनी ही मागणी केली आहे.
पूर्ववत गाड्या सुरू करा !
वास्तविक अजून ग्रामीण भागामध्ये आद्याप पूर्ववत गाड्या सुरू नसल्याने एसटी महामंडळाचे मराठवाड्यातील सर्व विभागीय आगार प्रमुखांनी इतर सर्व गाड्या लवकरात लवकर सुरु करण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांचे होत असलेले हाल होणार नाहीत.अशी मागणी प्रवाशी करत आहेत.
No comments