Breaking News

मंदिरे उघडणे हा मुद्दा हिंदुत्वाचा नसून धर्मनिरपेक्षतेचा - सुरेश पाटोळेबीड : भारत हा देश धर्मनिरपेक्ष देश असून इथे अनेक जातिपंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कोरोनाच्या काळात विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून केंद्र व राज्यसरकरने सर्व धर्माचे प्रार्थनास्थळे बंद केलेली आहेत.मंदिरे कधी उघडता ? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न खुद्द घटनात्मक  पदावर विराजमान असलेल्या महामहिम राज्यपालांनी विचारून घटनात्मक पदाचा घोर अपमान केला आहे. भारत हा सार्वभौम लोकशाहीचा देश आहे. धार्मिक स्थळे उघडणे हा हिंदुत्वाचा मुद्दा नसून तो धर्मनिरपेक्षचा आहे. हे महामहिम महोदयाना कधी कळणार असे मत सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे यांनी व्यक्त केले आहे.

  

महाराष्ट्रात प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय झाल्यास मंदिरे, मशिदी, दर्गे, चर्च, गुरुद्वारे, अग्यारी उघडणार आहेतच. धर्मविषयी जेवढे बोलाल,तेवढे जास्त धर्मनिरपेक्ष होत जाल. परंतु काही हिंदुत्ववादी व्यक्ती ठाकरे सरकारला हिंदुत्वाचा विसर पडला आहे. अशी टिका करतांना दिसत आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे मत व्यक्त करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतल्याचा अवमान आहे. असेही सुरेश पाटोळे म्हणाले आहेत.


No comments