Breaking News

राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने उभारली माणूसकीची भिंतआज झाला शुभारंभ; नको असेल ते द्या, हवे ते घेऊन जा..

परळी : राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने आज स्व. मोहनलालजी बियाणी अन्नछत्र परिसरात माणूसकीची भिंत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक तथा दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली. आपल्याला नको असेल ते येथे द्या, ज्याला हवे असेल तो गरजवंत येथून घेऊन जाईल अशी या माणूसकीच्या भिंतीमागील भूमिका आहे. अन्नछत्रच्या वतीने 20 रुपयांत जेवण देण्यासोबतच शहरतील 5 सार्वजनिक स्थळी मोफत अन्नदान मागील वर्षभरापासून करण्यात येत आहे.

आपल्याला आवडीच्या वस्तू आपण खरेदी करतो, अनेकदा अशा वस्तू कालबाह्य झाल्यानंतर त्या इतरत्र फेकून देतो. परंतु आपल्या जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतील वापरलेले कपडे, चष्मे, बॅटरी, जूनी सायकल, घड्याळ, पुस्तक, वह्या, पेन, पेन्सील व अन्य अशा अनेक वस्तू आपण टाकून देत असतो. आपल्यासाठी वापरात नसलेल्या या वस्तू गरिबांसाठी केवळ जिवनावश्यकच नाही तर त्या उपयुक्तही असतात. या पार्श्वभुमीवर राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व मराठवाडा साथीच्या वतीने माणूसकीची भिंत हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण संचलीत, अन्नछत्र, अशोक जैन प्रतिष्ठाणच्या समोर येथे ही भिंत कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन आहे की, त्यांना नको असलेल्या रोजच्या वापरातील विविध वस्तू कृपया येथे आणून सोपवाव्यात, ज्याला आवश्यक आहे तो येथून घेऊन जाईल. हे एक प्रकारचे दान असून या प्रक्रीयेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.


No comments