Breaking News

मुंडे यांच्या प्रयत्नातून कोरेगाव आणि कोठी झाले आकडे मुक्त


गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील कोरेगाव आणि कोठी या गावात लाईनमन आदिनाथ मुंडे यांच्यामुळे आकडेमुक्त झाले आहे.

कोरेगाव आणि कोठी या गावात वीज चोरीला आळा घालण्यासाठी लाईनमन आदिनाथ मुंडे यांनी सहाय्यक अभियंता अमोल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव आणि कोठी या गावातील येथील वीज वाहक तारा यांना प्लास्टिक पाईपचे आवरण बसविले आहे. त्यामुळे या परिसरातील व8ज गळती आणि वीजचोरी आता पूर्णपणे बंद झालेली आहे. यात विशेष बाब अशी की, लाईनमन आदिनाथ मुंडे हे अपंग असतानाही त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसह वीज ग्राहकांनी त्यांचे कौतुक केले आहे.


No comments