Breaking News

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 बीड :  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय बीड यांच्या वतीने बँकामार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी खालील प्रमाणे राबविल्या जाणाऱ्या योजनांचे कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत.

 

योजनांची नांवे, उदिष्टे - विशेष घटक योजना- २०, बीज भांडवल योजना-16, महामंडळाच्या वरील शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, डोर व होलार) असावा तसेच त्याने यापुर्वी महामंडळाच्या व इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पुर्ण पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव प्रत्येकी तीन प्रतीत टंकलिखित किंवा छापील स्वरुपात खालील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहुन कर्ज प्रस्ताव दाखल करावे असे आव्हान जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

             

कर्ज प्रस्तावा सोबत जोडावयाचे कागदपत्रे : जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,  रेशन कार्ड ,मतदान आधार कार्ड, पॅन कार्ड, ३ फोटो, दरपत्रक,प्रकल्प अहवाल (बीज भांडवल योजनेकरीता), जागेचा पुरावा लाईट बिल/टॅक्स पावती नमुना न. ०८, परवाना, बॅच (वाहन कर्जाकरीता) इत्यादी. वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील छायाकिंत प्रत केलेले अर्ज दि. २ नोव्हेंबर २०२० पासुन दि. ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत कार्यालयीन 
वेळेत सकाळी १०.३० ते ५:३० पर्यंत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय 
भवन, तळमजला, नगर रोड, बीड-४३११२२, दुरध्वनी क्र. -०२४४२-२२३५६७ या ठिकाणी कर्ज प्रस्ताव स्वतः प्रत्यक्ष अर्जदाराकडुनच स्थिकारले जातील याची नोंद घ्यावी. विशेष घटक योजने अंतर्गत महामंडळात यापूर्वी दाखल केलेले सर्व जुने कर्ज प्रस्ताच रद्द समजण्यात येतील असे हिरालाल गतखणे, 
जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, बीड यांनी कळविले आहे.

No comments