Breaking News

कॉम्रेड बाबासाहेब सरवदे यांचं दुःखद निधनअंबाजोगाई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड बाबासाहेब सरवदे यांचे रविवारी (दि.१८) सायंकाळी साडेसात वाजता दुःखद निधन झाले. 

कॉ. बाबासाहेब सरवदे हे अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे वर्किंग कमिटी मेंबर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य कमिटी सदस्य होते. बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षण  संस्थेचे ते अध्यक्ष होते. मागील एक वर्षापासून ते फुप्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होते. उपचारासाठी त्यांना स्वारती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्करोगाशी झुंज देत असतांना रविवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राज्यातील शेतमजूर चळवळीचे व डाव्या चळवळीचे अत्यंत नुकसान झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी कॉम्रेड सरोज सरवदे, मुलगा अजिंक्य व मुलगी मोनिका, जावई डॉ. प्रा. किरण चक्रे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या सोमवारी (दि.१९)  अंबाजोगाई येथील लाल नगर स्मशानभूमी मध्ये सकाळी नऊ वाजता होणार आहे. कॉ. सरवदे यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये दृष्टिकोन न्यूज परिवार सहभागी आहे. 


No comments