Breaking News

महेबूब शेख यांना विधान परिषदेवर संधी द्यावी- नसीरभाई शेखशिरूर कासार : तालुक्यातील महेबूब शेख यांनी आपल्या कार्याचा ठसा राज्य पातळीवर उमटवला असून त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी शिरूर कासार नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नसीरभाई शेख यांनी केली आहे.

महेबूब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा राज्यात उमटवला आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राज्यभर प्रचारासाठी फिरले होते. आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना निवडून आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली तर ते आपली चुणूक दाखवू शकतात. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी शिरूर कासार नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नसीर भाई शेख यांनी केली आहे.No comments