Breaking News

भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खा राजकुमार चाहर महाराष्ट्र दौ-यावर


बीड : भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. राजकुमारजी चाहर दि.19 व 20 आक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र दौ-यावर येत असुन या दौ-यात ते शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. तर मुबइत किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मामार्गदर्शन करणार आहेत. 

    लोकनेते देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी शेतकरी हिताचे तीन कृषी विधेयके पारित केल्यानंतर विरोधी पक्षांनी याबाबत शेतक-यांची दिशाभूल करण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.राजकुमारजी चाहर देशभर दौरा करून  शेतक-यांशी संवाद साधत आहेत. तर विधेयकामुळे शेतक-यांचे भले होणार असल्याने कार्यकर्त्यांनी शेतक-यांमध्ये जाउन त्यांच्या मनात निर्माण झालेले गैरसमज दुर करण्यासाठी मामार्गदर्शन करीत आहेत. याच अनुषंगाने मा.खा.राजकुमारजी चाहर सोमवार दि.19 आक्टोबर 2020 रोजी दिल्ली येथुन सकाळी अकरा वाजता पुण्यात येणार आहेत. ते पुणे येथे दुपारी एक वाजता श्रमीक पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

पत्रकार परीषदेस भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.अनिल बोंडे, मा.खा.गिरीष बापट, मा.आ.महेश लांडगे,माजी आ.जगदीश मुळीक, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता रायगड जिल्ह्यात पनवेल-खालापुर महामार्गावर गिरवले येथे ट्रॅक्टर पुजन करुन शेतक-यांशी संवाद साधतील. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.अनिल बोंडे, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष मा.आ.प्रशांत ठाकुर,किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, चिटणीस अशोक गायकर,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे उपस्थीत असतील. मंगळवार दि.20 आक्टोबर 2020 रोजी दुपारी एक वाजता मुंबईत भाजपा कार्यालय वसंत स्मृति, दादर येथे पत्रकार परिषद व दोन वाजता किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यकारीणीला व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करतील. यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.अनिल बोंडे, भाजपाचे संघटन मंत्री मा.विजयराव पुराणिक, भाजपाचे महामंत्री मा. सुजितसिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली आहे.

   

                                     

No comments