Breaking News

शिवसंग्रामचे दत्ता गायकवाड यांची तब्येत खालावण्यास सुरुवात; काम सुरु होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार - दत्ता गायकवाडजाणीवपूर्वक रखडवलेल्या रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यासाठीच्या उपोषणाचा तिसरा दिवस उघडला

बीड : गेल्या ३ दिवसांपासून शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांचे उपोषण सुरु असून आज त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टरांकडून करण्यात अली आहे. मात्र अद्यापदेखील प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेता आपली मुजोरपणा दाखवून दिलेला आहे. रस्त्याची कामे सुरु करेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे शिवसंग्रामचे माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांनी म्हंटले आहे.

       

नगरपरिषद, बीडच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांचे प्रचंड हाल होत आहेत, शहरातील पिंपरगव्हाण रोड, हिरालाल चौक, मोंढा रोड, शाहूनगर या भागातील रस्त्यांच्या कामांना बोगसगिरीचे नाव देऊन जाणीवपूर्वक थांबवले गेले आहे. हे सर्व काहीतरी मिळवण्यासाठीचे भांडणे बीडकरांच्या जीवावर उठत आहेत, बीडकरांचे जगणे मुशकील झाले आहे. रस्त्याचे काम सुरु करायचे सोडून पत्रकबाजी करत शहरातील नागरिकांना मिसगाईड करण्याचे काम सत्ताधारी क्षीरसागरांनी सुरु केले आहे.


 अन त्यात भर पडत आहे ती नगरपरिषदेच्या निगरगट्ट मुख्याधिकाऱ्यांची, नागरिकांच्या त्रासाला जबाबदार धरून मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना निलंबित करा व अशी मागणी बीडकरांना नाहक त्रास देणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली आहे.

    यावेळी सरचिटणीस अनिल घुमरे, नारायण काशीद, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, जिल्हा उपाध्यक्ष विध्यार्थी अक्षय माने, डॉ बंड, स्वीय सहायक धनंजय गुंदेकर, सुनील धायजे, शैलेश सुरवसे, रघुवीर कुरे, गणेश धोंडरे, सौरभ तांबे आदींसह शिवसंग्राम पदाधिकारी उपस्थित होते.No comments