Breaking News

बीड जिल्ह्याला प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा

 परळी :  प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबईच्या वतीने आज तातडीने एक सूचना जारी करून बीड जिल्ह्याला मोठ्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी यांनीही हे पत्र जाहीर करून मुसळधार मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्तीचे संभाव्य धोका लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून येत्या काही दिवस मोठा पाऊस पडेल असा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या वतीने आज दि. 13 ऑक्टोबर 2020 रोजी देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिनांक 13 ते 17 ऑक्‍टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर शेतात किंवा मोकळ्या जागेत थांबू नये असे आवाहन केले. पावसाची शक्यता लक्षात घेता बाल्कनी किंवा ओट्यावर थांबू नये असेही आवाहन करण्यात आले आहे विद्युत उपकरणे पाऊस चालू असताना बंद करावीत अशीही सूचना करण्यात आली आहे दरम्यान परतीचा पाऊस वाढत असतानाच तो धोकादायक होऊ शकतो असे हवामान खात्याने कळविले असून नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


No comments