Breaking News

कोरोना योद्धा पुरस्काराने पत्रकार बबलू सय्यद सन्मानित


आष्टी :  तालुक्यातील धानोरा येथील साप्ताहिक तेजवार्ताचे संपादक व पत्रकार बबलू सय्यद यांना स्वयंपूर्ण फाऊंडेशन अहमदनगरच्या वतीने गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

कोरोना काळात उत्कृष्ट बातम्याचे संकलित करून तेजवार्ता  चॅनल च्या माध्यमातून संपादक बबलू सय्यद यांनी उत्कृष्ट वार्तांकन कार्य केल्यामुळे त्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष जावेद पठाण, सचिव अविशांत कुमकर, कार्याध्यक्ष निसार शेख, दिगंबर बोडखे, मनोज सातपुते, अक्षय विधाते, संतोष नागरगोजे, अण्णासाहेब साबळे, कासम शेख, संजय खंडागळे,तुकाराम भवर, अतुल जवणे, संतोष ससाणे, अशोक तळेकर, सुरेश मोरे आदींनी अभिनंदन केले.


No comments