Breaking News

आजोळ प्रकल्पातील अनाथ वृद्धांना मास्क आणि सॅनिटायझर,फळाचे वाटप

IPS वसंतराव परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप

शिरूर का. : शिरुर कासार तालुक्यातील राक्षसभुवन येथे निराधार आणि निराश्रित नागरिकांना आधार असलेल्या आजोळ प्रकल्पातील वृद्धांना व अनाथ लोकांना  मास्क,सॅनिटायझरचे,व फळाचे वाटप करण्यात आले.शिरुर कासार शहराचे भूमिपुत्र आणि सध्या वाशीम जिल्हा येथे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले IPS श्री.वसंतराव परदेशी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनोज परदेशी यांनी राक्षसभुवन येथील प्रकल्पात वास्तव्यास असलेल्या अनाथ वयोवृद्धांना मास्क, सॅनिटायझर आणि फळांचे वाटप केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर तहसिल कार्यालयाचे तहसीलदार श्रीराम बेंडे  तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गोकुळ पवार,संचालक कर्ण तांबे,जीवन कदम,आदित्य कदम यांची उपस्थिती होती.शिरुर शहराचे भुमिपुञ IPS श्री.वसंतराव परदेशी साहेब यांनी सुरुवातीला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आष्टी येथे चार वर्षे सेवा बजावली होती.त्यानंतर पदोन्नती होऊन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून जालना येथे 4 वर्षे सेवा केली.व तेथुन औरंगाबाद येथे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस उपायुक्त म्हणून काम केले.त्यानंतर विशेष पोलिस महानिक्षक कार्यालय औरंगाबाद येथे संरक्षण नागरी हक्क पोलिस अधिक्षक म्हनुन होते. आता सध्या ते वाशीम येथे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी केलेला संघर्षमय  जिवन प्रवासाबद्दल आजोळ मध्ये उजाळा देण्यात आला. 

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट  अशक्य नाही - तहसीलदार बेंडे 

शिरुर शहराचे भुमीपुञ IPS श्री.वसंतराव परदेशी हे आज एवढ्या मोठ्या पदावर आहेत.त्यांचा आदर्श तरुणांने घ्यावा.त्यांनी गरीबीवर मात करुन जिद्द व चिकाटी करुन अभ्यास केला व आज ते IPS आहैत.त्यांचा आदर्श घेवुन बीड जिल्ह्यातील तरुनांने स्पर्धापरिक्षा चा अभ्यास करुन आपले स्वप्न पुर्ण करावे.असेही तहसिलदार श्रीराम भेंडे बोलताना म्हणाले. 


No comments