Breaking News

राज्यकर्त्यांनो आणि विरोधकांनो दौऱ्याचा फार्स बंद करा; शेतकऱ्यांना मदत जाहीर करा-दत्ता वाकसेबीड : गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने थैमान घातले होते त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे आणि नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे परंतु  आता राज्यकर्त्यांनो  आणि विरोधकांनो केंद्र आणि राज्य सरकारकडून तात्काळ मदत जाहीर करा आणि दौऱ्याचा फार्स बंद करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करा असे प्रसिद्धीपत्रक धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे. 

पत्रकात म्हटलं आहे, की  गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यकर्त्यांनी  आणि विरोधकांनी पाणी आणि दौरे झाले असतील तर शेतकऱ्यांना आता तात्काळ मदतीची गरज आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये नुकसानभरपाई  वर्ग करून त्यांची आगामी येणारी दिपावळी गोड करा शेतकरी हा अतिशय बेचैन झाला असून त्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने संपूर्णता गेले आहे.

 

त्यामुळे राजकीय नेत्यांनी विरोधकांनी आणि राज्यकर्त्यांनी दौऱ्याचा फार्स बंद करून केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये नुकसानीचे अनुदान वर्ग करा शेतकऱ्यांना आता   आश्वासनाची नाही तर तात्काळ मदतीची गरज आहे या परतीच्या पावसाच्या सुलतानी संकटांमुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून  हातातोंडाशी आलेला कापूस सोयाबीन बाजरी या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यावर हे अतिशय मोठे संकट आहे त्यामुळे तात्काळ केंद्र व राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर करावे असेदेखील दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे वाकसे यांनी म्हटले आहे.


No comments