Breaking News

अपघातात गोविंदवाडीच्या महीलेचे निधन

  माजलगाव :  तालुक्यातील गोविंदवाडी येथील परसराम संभाजी जाधवर हे मोटरसायकलवर येरमाळा येथून माजलगाव कडे येत आसतांना मोटरसायकल स्लिप झाल्याने या आपघातात मागे बसलेल्या विमल लक्ष्मन नागरगोजे(40) या जागीच ठार झाल्या.ही घटना दि.24 आक्टोंबर रोजी राञी आठ वाजता घडली.

         

याबाबत अधिक माहीती अशी की,गोविंदवाडी येथील परसराम संभाजी जाधवर व विमल लक्ष्मण नागरगोजे  हे नविन शाईन मोटरसायकलवर  येरमाळा येथून माजलगाव कडे येत असतांना कळंब रोडवर हासेगाव येथे मोटरसायकल स्लीप झाल्याने झालेल्या आपघातात विमल लक्ष्मन नागरगोजे या जागीच ठार झाल्या.तर परसराम जाधवर हे जबर जख्मी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णाल्यात उपचार सुरु आहेत. हा आपघात दि.24 आक्टोंबर रोजी राञी आठ वाजता घडला.या आपघात प्रकरणी मयताचा भाऊ मेघराज लक्ष्मन नागरगोजे याच्या फिर्यादीवरुन कळंब पोलीस स्टेशन येथे  आपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.


No comments