Breaking News

ना.पंकजाताईच्या नेतृत्वाखाली ऊसतोड मजुरांच्या मागण्या लवकरच मान्य होणार:- मा.आ. केशवराव आंधळे


व्हिडीओ काॅन्फरन्स बैठकीत मागण्यांबाबत साखर संघाची सकारात्मक भूमिका 

जगदीश गोरे । वडवणी

मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऊसतोड मुकादम कामगार यांचा बेमुदत संप सुरू असून या संपाचा तोडगा निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे ऊसतोड कामगार संघटना पदाधिकारी व साखर संघ महाराष्ट्र राज्य यांची संयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्स काल बुधवार दिनांक 7 रोजी दुपारी संपन्न झाली. या बैठकीत कामगार संघटनेच्या वतीने आपल्या मागण्या सविस्तरपणे विशद केल्या दरम्यान या मागण्यांचा साखर संघ सकारात्मक दृष्टीने विचार करत असून ऊसतोड मुकादम व मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड मजुरांच्या मागण्या लवकरच मान्य होणार असल्याची माहिती माजी आमदार केशवराव आंधळे यांनी या व्हिडीओ काॅन्फरन्स बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. 

                   

  याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ऊसतोड मुकादम व मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऊसतोड मुकादम व कामगार यांचा बेमुदत संप सुरू असून या संपाचा धसका सर्वच साखर कारखाने व साखर संघासह शासनाने घेतला आहे. याच संपाच्या अनुषंगाने साखर संघ महाराष्ट्र राज्य व ऊसतोड मुकादम कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यात तिसरी बैठक काल बुधवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2020 रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाले यामध्ये साखर संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तर ऊसतोड मुकादम कामगार संघटनेच्यावतीने स्व.गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी मुकादम मजूर व वाहतूकदार संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार केशवराव आंधळे अध्यक्ष श्रीमंतराव जायभाये ऊसतोड श्रमिक मजूर संघाचे अध्यक्ष दत्तात्रय भांगे प्रा सुशीलाताई मोराळे सिटू संघटनेचे डी एल कराड प्रदीप भांगे जीवन राठोड यासह इतर मान्यवर विविध ठिकाणाहून या ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

 दरम्यान ऊसतोड मुकादम कामगारांनी पुकारलेला संप लवकरात लवकर मिटावा यासाठी साखर संघ प्रयत्नशील असून या तिसऱ्या बैठकीत सर्व मागण्यांविषयी सविस्तर अशी चर्चा झाल्यानंतर संपाविषयी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साखर संघ व ऊसतोड संघटना यांच्यात मुंबई मध्ये दि 10 सप्टेंबर व पुण्यात दि 24 सप्टेंबरला दोनदा बैठका झाल्या होत्या मात्र त्यावेळी समाधानकारक तोडगा निघाला नव्हता गाळप हंगाम येत्या दिनांक 15 ऑक्टोंबर पासून सुरू होणार असल्याने पुढील आठवड्यात होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यावेळी माजी आमदार केशवराव आंधळे यासह अन्य पदाधिकारी यांनी खालीलप्रमाणे मागण्या साखर संघाच्या मान्यवरांसमोर विशद केल्या यामध्ये प्रामुख्याने ऊसतोड मजुरांना हार्वेस्टर यंत्राप्रमाणे ऊस तोडणी मजुरी दरवाढ देण्यात यावी मुकादम यांना देण्यात येणाऱ्या कमिशनमध्ये भरीव वाढ करण्यात यावी मजुरांसाठी तातडीने विमा योजना लागू करण्यात यावी त्या विम्याचा प्रिमियम सर्व साखर कारखान्यांनी भरावा दुर्दैवाने ऊसतोड मजुराचा मृत्यू झाल्यास त्या मजुराच्या कुटुंबीय आज शासनाने पाच लाख रुपयांची आर्थिक सहाय्य करावे त्याचप्रमाणे एखादा बैल दगावल्यास एक लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे ऊस तोडणी मजूर व त्यांच्यासोबतच्या जनावरांना मोफत आरोग्य सेवा देण्यात यावी सर्व मजुरांची अधिकृत नाव नोंदणी करून त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावे मजुरांच्या पाल्यांना चांगले व मोफत शिक्षणाची व्यवस्था करावी तसेच निवासी वस्तीग्रह द्वारे त्यांची राहण्याची व आरची व्यवस्था करावी ऊसतोड मजुरांसाठी चा कायदा तात्काळ लागू करून तसा शासन आदेश काढण्यात यावा स्व गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे व त्याद्वारे सर्व मजुरांसाठी विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात त्याचप्रमाणे मागील तीस वर्षापासून ची परंपरा असलेला लवाद कायम ठेवण्यात यावा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे ऊसतोड कामगारांचे प्रमुख प्रश्न लवाद प्रमुख या नात्याने शासन दरबारी लावून धरत होते व याच लवादाच्या मध्यस्थी तून ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य झालेले आहेत आता त्यांच्या पश्चात पंकजाताई मुंडे याच लवाद प्रमुख असून आम्हा ऊसतोड मजूर मुकादम यांच्या नेते आहेत. 

 पंकजाताई मुंडे या जो निर्णय घेतील तोच आमच्या संपकरी संघटना, ऊसतोड मजूर यांना अंतिम व मान्य राहील मात्र जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार असून साखर संघाने सर्व मागण्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी भूमिका यावेळी केशवराव आंधळे यांनी मांडली. दरम्यान पंकजाताई मुंडे या साखर संघ कामगार संघटना यांच्यात लवाद प्रमुख या नात्याने त्या नक्कीच योग्य तो मार्ग काढतील. अशी आशा आता निर्माण झाले आहे.दरम्यान या मागण्यांचा साखर संघ सकारात्मक दृष्टीने विचार करत असून ऊसतोड मुकादम व मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड मजुरांच्या मागण्या लवकरच मान्य होणार असल्याची माहिती माजी आमदार केशवराव आंधळे यांनी या व्हिडीओ काॅन्फरन्स बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.No comments