Breaking News

अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान, या अडचणीच्या प्रसंगी राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी- पालकमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे थेट शेताच्या बांधावर

गेवराई तालुक्यातील हिरापूर, इटकूर,  मिरकाळा, मादळमोही येथे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची पाहणीगेवराई : अतिवृष्टी पावसांने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. पिकविमासह या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी केले. 

  परतीच्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कापूस,  सोयाबीन आदी पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करत आहेत . यावेळी हिरापूर शिवारातील अंबादास तुकाराम ढेंगळे या अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देताना ते बोलत होते. 

या दरम्यान गेवराई तालुक्यातील हिरापुर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी पालकमंत्री श्री मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार,  जिल्हा परिषद सदस्य विजय सिंह पंडित उप विभागीय अधिकारी नामदेव टिकेकर,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम,  माजी आ. अमरसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


No comments