Breaking News

गेवराई तालुक्यातील मोसंबीसह ईतर फळांना मुंबईत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार - सभापती अशोक डकअशोक डक यांचा विजयसिंह पंडित यांनी केला पहिला नागरी सत्कार


गेवराई :  अमरसिंह पंडित यांच्या विशेष प्रयत्नातून सिरसमार्ग येथे सिंदफना नदीवर बंधारा उभारल्यामुळे या भागात मोसंबी आणि ईतर फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. या फळांना मुंबई मध्ये हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी केले. सभापती पदी निवड झाल्या बद्दल गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात  आले होते, यावेळी ते बोलत होते. व्यसपीठावर आ.संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती बाबुराव जाधव उपस्थित होते. याप्रसंगी निराधार समितीच्या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  सभापती पदी अशोक डक यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवाजीनगर गढी येथे रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि.प. सभापती बाबुराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


या प्रसंगी अशोकराव डक यांचा गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. संदीप क्षीरसागर, माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सभापती बाबुराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच संजय गांधी निराधार योजनेचे नुतन पदाधिकारी शिवाजी डोंगरे, सय्यद सहरुनिसा फातीमा, बापु गाडेकर, शेख मन्सूर, नंदकुमार झाडे, ज्ञानेश्वर नवले, रघुनाथ मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना अशोकराव डक म्हणाले की, सामान्य माणसाला पदावर बसवण्याची धमक फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि  पवार घराण्यातच आहे. ना. धनजंय मुंढे, माजी आमदार अमरसिंह पंडित, यांच्यामुळे मला हा सन्मान मिळाल्याचे सांगत डक आणि पंडित परिवाराचे पुर्वीपासून अतिशय जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध आहेत. माझे वडील कै. गोंविदराव डक आणि माजी मंत्री आणि जेष्ठ नेते आदरणीय शिवाजीराव ( दादा ) पंडित यांची मैत्री अतुट होती. माझ्या राजकीय वाटचालीत मी अजूनही शिवाजीराव दादांचा आशिर्वाद घेतल्याशिवाय  पुढे जात नाही. दादांच्या आशिर्वादामुळेच मी आज मुंबई बाजार समितीच्या सभापतीपदी विजयी झाल्याचे ते म्हणाले. सभापती झाल्यामुळे माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यात पहिला माझा सत्कार केला असून आपल्या भागात झालेल्या या  सत्कारामुळे मला मनापासून आनंद होत असल्याचेही ते म्हणाले. आपल्या हक्काचा माणूस म्हणून मी आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या फळ, भाजी आणि ईतर शेतमालाला जास्तीत जास्त भाव आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करील असेही ते शेवटी म्हणाले. 


यावेळी बोलताना संदिप क्षीरसागर म्हणाले की, राजकीय समिकरणे जुळवत असतांना या पुर्वी अशोक डक यांच्यावर सतत अन्याय झाला, तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्याचेच फळ त्यांना सभापतीच्या रुपाने मिळाले. त्यांच्यामुळे आपल्याला यापुढे फायदा होणार आसल्याचे ते म्हणाले. आदरणीय अमरसिंह पंडित हे मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभा राहिल्यामुळे आणि गेवराईच्या प्रेमामुळे आपण आमदार झालो असून माझ्या आमदारकी मध्ये भैय्यासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. या पुढील काळात आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे असेल असेही ते म्हणाले. 

आपल्या भाषणात बोलताना विजयसिंह पंडित यांनी अशोक डक यांचे अभिनंदन करुन म्हणाले की, अशोकराव डक यांनी शब्द आणि निष्ठा एक ठेऊन पक्षाचे काम केले. त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना सभापदी पदी संधी दिली, अशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई बाजार समितीच्या सभापती पदी अशोकराव डक सर्वाधिक मताने विजयी झाल्यामुळे बीड जिल्ह्याचा सन्मान झाला आहे. तळागाळातील माणसांना ताकद देऊन त्यांना साभाळण्याची परंपरा डक परिवाराची आहे. माजी आमदार कै. गोंविदराव डक साहेबांच्या नावाला शोभेल अशी अशोकराव डक वाटचाल करत आहेत. त्यामुळे आपल्या भागातील अशोकराव मुंबई बाजार समितीत गेल्यामुळे त्याचा खुप मोठा फायदा आपल्याला होणार आहे असेही ते म्हणाले. प्रस्तावित तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव चाटे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सभापती जगन पाटील काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, ऋषिकेश बेदरे, संभाजी पवळ, दत्ता दाभाडे, शांतीलाल पिसाळ, शेख सलिम, महंमद गौस, गोरक्ष शिंदे, रवि शिर्के, बाबासाहेब आठवले, शेख सलिम, वसिम फारोकी, मदन लगड, वचिष्ठ शिंदे, विकास सानप, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, व कांही कार्यकर्ते  उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम, काळजी घेत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सँनिटायझरसह थर्मामिटर वापर करण्यात आला.


No comments