Breaking News

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना सारथी अंतर्गत निधी द्या


आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांची मागणी ; अजित दादांच सकारात्मक आश्वासन 


नको ते पाऊल उचलू नका,आरक्षणासह समाजाचे प्रश्न सोबत मिळून सोडु व आरक्षणासाठी लढू

आमदर संदीप भैय्यांची मराठा समाज बांधवांना भावनिक साद

बीड :  माझ्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रमाणे यूपीएससी व एमपीएससीच्या तयारीसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते,त्याच प्रमाणे नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील युवक बांधवांसाठी सारथी संस्थेतून शिष्यवृत्ती देण्यात यावी व इतर निधीची तरतुद करण्यात यावी अशी मागणी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी करत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मराठा समाजातील विविध प्रश्न कानी टाकले, यावर उपमुख्यमंत्री अजित दादा याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. मराठा बांधवांनो भगिनींनो नको ते पाऊल उचलू नका,चुकीचा मार्ग निवडू नका आपण शिवरायांच्या विचारांनी जगणारे मावळे आहोत. आरक्षणासह समाजाचे प्रश्न सोबत मिळून सोडू व आरक्षणासाठी लढूया मी कायम आपल्या सोबत आहे,अशी भावनिक हाक  आ. संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.

बीड  तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्यांने मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समजल्याने मन अतिशय व्यथित झाले अशी प्रतिक्रिया आ.संदीप भैय्या यांनी व्यक्त केली आहे. या विषयी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटून यूपीएससी व एमपीएससी या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी  संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी केली व रहाडे परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे आ. संदिप क्षीरसागर यांनी सांगितले.  तालुक्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे हा नीटच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. यासाठी क्लासची फीस भरण्यासाठी त्याच्या पालकांनी व्याजाने पैसे घेतले होते. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आपला प्रवेश होणार नाही या तणावात त्याने नको ते पाऊल उचलले. या बाबत गुरुवारी  राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची वेळ घेतली व तातडीने त्यांची भेट घेऊन माझ्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रमाणे यूपीएससी व एमपीएससी च्या तयारीसाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. त्याच प्रमाणे नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या बांधवांसाठी सारथी संस्थेतून शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे.

पाच हजार विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल

MBBS/BDS ला प्रवेश मिळविण्यासाठी द्यावी लागणारी नीट ही परीक्षा NCERT म्हणजेच दिल्ली बोर्डच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असल्याने त्याची तयारी महाराष्ट्रतील एकही महाविद्यालयात होत नाही,म्हणून दरवर्षी मराठा समाजातील विद्यार्थी नीटची कोचिंग घेण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात लाखो रुपये खर्च करतात व परीक्षेनंतर अपयश पदरी पडल्यास चुकीचे मार्ग काही जण निवडत आहेत, ते थांबवण्यासाठी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या, याने दर वर्षी नीट ची परीक्षा देणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटेल.

No comments