Breaking News

शिराळ्यात शासकीय मूग उडीद सोयाबीन खरेदी केंद्राला सुरवात के. के. निकाळजे । आष्टी 

 आष्टी तालुक्यात यावर्षी चांगल्या पावसामुळे वेळेवर पडलेल्या पावसामुळे मूग उडीद सोयाबीन  ही नगदी पिके चांगल्या प्रमाणात आल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असला तरी मात्र सततच्या पावसामुळे पिकांचे काही भागांमध्ये नुकसान झाले आहे उडीद मूग सोयाबीन खाजगी व्यापाऱ्याकडे घालताना शेतकऱ्याची काही प्रमाणात फसवणूक केली जाते त्यामुळे आष्टी तालुक्यातील शिरोळ येथे शेतकीय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शिराळ अंतर्गत आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नाने शासकीय मूग ,उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे तरी शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून आपला शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर आणावा असे आवाहन शेतकीय विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिराळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

शिराळा येथे यापूर्वीही  शासकीय हमीभाव प्रमाणे तूर, हरभरा  खरेदी  करण्यात आली होती  चांगल्या प्रकारे खरेदी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या केंद्रावर आहे या केंद्रावर शासकीय हमीभाव मुग 7200 उडीद 6000 सोयाबीन 3800 असा असून यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. 

 सात बारा,8 अ, पासबूक ,पिकपेरा ,आधार कार्ड  ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी व आपला शेतमाल शासकीय हमी केंद्रावरच घालावा असे आवाहनही शेतकीय सहकारी सेवा सोसायटी शिराळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments