Breaking News

विनय नातु यांनी शिक्षकांच्या विषयी व्यक्त केलेले वक्तव्य हे बालिशपनाचे - रमेश पोकळे


विनय नातु यांनी शिक्षकांची जाहीर माफी मागावी -- रमेश पोकळे 

बीड : कोरोना संसर्ग माहामारी संदर्भात शासनाने जाहिर  केलेल्या लाॅकडाऊनच्या काळात व नंतरही शिक्षकांनी राज्य शासनाने सोपवलेली अशैक्षणीक  कामे आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून  पगार वेळेवर होत नसतांनाही प्रामाणिकपणे  पार पाडलेली असतांना शिक्षकांच्या कार्यप्रणाली विषयी मुल्यमापन करण्यासंदर्भात माजी आमदार विनय नातु यांनी केलेले वैयक्तीक वक्तव्य हे बालीशपणाचे व मनोविकृत असल्याचे लक्षण आहे. 

तेंव्हा माजी आमदार विनय नातु यांनी शिक्षका प्रती व्यक्त केलेल्या वायफळ वक्तव्याबद्दल शिक्षकांची जाहीर माफी मागावी असे आवाहन मराठवाडा शैक्षणीक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीचे माजी चेअरमन शिक्षक नेते रमेशभाऊ पोकळे यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या अकार्यक्षम शैक्षणीक धोरणाविषयी टिका टिपण्णी, वैचारिक वादविवाद करणे स्वाभाविक आहे. परंतु कोरोना संसर्ग लाॅकडाऊनच्या काळात शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नसतांनाही बिनडोक राज्य सरकारने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्या शिक्षकांना दारूच्या दुकानावर, स्वस्त धान्य दुकानावर, तपासणी नाक्यावर, किराणा सामान वाटप करण्यासाठी, कोरोना वार्डात,कंन्टामेंट झोनमध्ये सर्व्हे करण्यासाठी तसेच कोरोना पेशन्टच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पविञ  शिक्षकी पेशाला न शोभणारी अशैक्षणीक कामे करण्यासंदर्भात हिटलर वृत्तीने आदेश दिले होते. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांनी शासनाने अपमानास्पद सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. 

कोरोना संसर्गच्या काळात आरोग्य विभाग व महसुल प्रशासन यांच्या समवेत राज्य शासनाने सोपवलेली जबाबदारी पार पाडत असतांना अनेक शिक्षकांचे अपघातात दुर्दैवी निधन झालेले आहे. तसेच अनेक शिक्षकांना त्यांच्या कुटुंबियांना कोरोना संसर्ग झाला होता त्यामधेही अनेक शिक्षकांनी कोवीड योद्धा म्हणून आपले बलीदान दिलेले आहे. असे असताना राष्ट्रीय आपत्ती मध्ये आपले बलिदान दिल्याबद्दल शहिद सैनिकाप्रमानेच शिक्षकांच्या कुटूबियांच्या सन्मान होणे आवश्यक आहे. वास्तविक पाहता कोरोना संसर्ग माहामारी काळात शिक्षकांना जास्तीची वेतन वाढ देणे आवश्यक असतांना व  कोवीड योद्धा म्हणून शैक्षकांनी केलेल्या कार्याचा सन्मान व गौरव होणे अपेक्षित असतांना माजी आमदार विनय नातु यांनी शिक्षकांच्या कार्य प्रणालीवर वैयक्तीक टिका करुन आपल्या आकलेचे तारे तोडले आहेत त्यांच्या या बेजबाबदार वक्तव्याचा शिक्षक नेते रमेशभाऊ पोकळे यांनी  जाहीर निषेध केला आहे.

तेंव्हा विनय नातु यांना आपल्या बेजबाबदार वक्तव्या बद्दल जनाची नाही तर... मनाची लाज वाटत असेल तर त्यांनी शिक्षकांची जाहीर माफी मागावी असे आवाहन मराठवाडा शैक्षणीक विकास परिषदेचे अध्यक्ष तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थायी समितीचे माजी चेअरमन शिक्षक नेते रमेशभाऊ पोकळे यांनी केले आहे.


No comments