Breaking News

बीड शहरात अवैधरित्या विक्रीसाठी जाणारी एक लाखाची दारू जप्त ; शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय नाचण व सहकार्यांची धडाकेबाज कारवाईबीड : एका ॲटोरिक्शातुन अवैधरित्या विदेशी दारू विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय विजेंद्र नाचण व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचुन कारवाई करत ॲटोरिक्शा पकडुन त्यातील विक्रीसाठी जाणारी तब्बल एक लाखाची विदेशी दारू जप्त करून मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत. तर याकारवाई बद्दल पोलीसांचे अभिनंदन होत आहे. 

          

यासंदर्भात पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पीएसआय विजेंद्र नाचण व त्यांचे सहकारी गुरूवारी दुपारी पोलीस गाडीने शहरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत क्र MH-23 L 2522 या ॲटोरिक्शाने कारागृह परिसरातुन नाट्यगृहाकडे विदेशी दारू अवैध विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.ही माहिती मिळाल्यावरून पीएसआय नाचण यांनी ही आपल्या वरिष्ठांना देऊन,व दोन पंचांना सोबत घेऊन,दवाखाना चौकात सापळा लावला.यावेळी खबऱ्याने दिलेल्या माहिती प्रमाणे तो ॲटोरिक्शा दवाखान्यासमोरून कारागृह रस्त्याकडे जात असताना पोलीसांनी त्याला हात दाखवून थांबवले असता त्यात मॅक्डाॅल नंबर वन दारूचे चार बाॅक्स,किंमत 28800 रू,ऑफीसर चाॅईसचे चार बाॅक्स किंमत 6720रू,मॅक्डाॅल नं.वन रमचे  बाॅक्स किंमत3120रू,व एक रिक्शा किंमत 70000रू.असा ऐवज जप्त करून दोन जणांच्या विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

यामुळे अवैध दारू विक्री करणारांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार,शिवाजी नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजेंद्र नाचण व त्यांचे सहकारी पो.ना.चव्हाण, पो.ना.कागदे आदिनी ही कारवाई केली. याबद्दल वरिष्ठ अधिकारी व नागरिकांनी पोलीसांचे अभिनंदन केले.


No comments