Breaking News

जयभवानी साखर कारखान्याचे ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट - चेअरमन अमरसिंह पंडित३८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ संपन्न

अविनाश इंगावले । गेवराई 

जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ या  वर्षाच्या गळीत हंगामाची तयारी पुर्ण झाली असून या हंगामात सात लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती  कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. कारखान्याच्या सन २०२०-२१ या गळीत हंगामाच्या  ३८ व्या  बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. संचालक,अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.

जयभवानी सह. साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रविवार, दि.४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. शिवाजी महाराज यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांचे अध्यक्षतेखाली कोविड-१९ संदर्भातील सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर इत्यादी नियमांचे पालन करून संपन्न झाला. या समारंभाला कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंह पंडित, कारखान्याचे व्हा.चेअरमन जगन्नाथराव शिंदे, बाजार समितीचे सभापती जगन्नाथराव काळे, संचालक अशोक नरोटे, कुमारराव ढाकणे, ऋषिकेश बेदरे, भाऊसाहेब  नाटकर, श्रीराम आरगडे, भास्करराव खरात, कार्यलक्षी संचालक जगन्नाथराव दिवाण आदी मान्यवर उपस्थित होते.


जय भवानी सहकारी साखर कारखाना यावर्षी सात लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे, याबाबत आवश्यक तयारी आम्ही केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी सांगितले. यावेळी जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी प्रास्ताविक भाषण केले, नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी शुभाशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन  कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी संदिप भोसले यांनी केले. यावेळी  कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, मुख्य अभियंता अशोक होके, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे,चीफ अकौन्टंट एल.आर.नवले, सिव्हिल इंजिनियर भालचंद्र कुलकर्णी, डिस्टिलरी इन्चार्ज राजेंद्र बढे, सुरक्षा विभागाचे आत्माराम गोरे, प्रशासन विभागाचे गोविंद चव्हाण  व  इतर अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.


No comments