Breaking News

बर्दापुर येथील घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करा - भास्कर मस्केगौतम बचुटे । केज  

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे अज्ञात व्यक्तीने दि .२७ ऑक्टोबर रोजी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली. त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत रिपाइं  शहराध्यक्ष भास्कर मस्के यांच्या नेतृत्वाखालो तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ आरोपी अटक करण्याची मागणी केली आहे.

 

रिताईंचे शहाराध्यक्ष भास्कर मस्के यांच्या नेतृत्वाखाली केज येथे कार्यकर्त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे अज्ञात माथेफिरूने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची केलेली नासधूस या घटनेचा निषेध व्यक्त करून नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात या निंदनीय घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) केजचे शहराध्यक्ष भास्कर मस्के यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

या वेळी ईश्वर सोनवणे, उत्तमआप्पा मस्के, दिलीप बनसोडे, सुभाष हजारे, अंगद शिनगारे, अजित सरवदे, अंबादास तुपारे, अमोल मस्के, महादेव सरवदे या कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.


No comments