Breaking News

जलपूजनाच्या श्रेयवादा वरून मांजराचे पाणी पेटले !

पालकमंत्र्याच्या जलपूजना नंतर आत्ता आमदार नमिताताई मुंदडा करणार मांजराचे जलपूजनगौतम बचुटे । केज  

पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील मांजरा धरणाचे जलपूजन केल्या नंतर आता भाजपाच्या आमदार नमिताताई मुंदडा या आज पुन्हा त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येत आहे.

मांजरा धरण हे ९८.९८ टक्के भरले असल्याने दि. २६ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विधान परिषदेचे आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे आणि उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार मेंढके व अन्य पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जलपूजन केले. मात्र या कार्यक्रमाला भाजपाच्या आमदार नमिताताई मुंदडा या उपस्थित नव्हत्या. दरम्यान आता दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते पुन्हा दुसऱ्यांदा जलपूजन होणार आहे. या जलपूजन कार्यक्रमाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळे केज तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात जलपूजनाच्या श्रेयवादा वरून चांगलेच राजकारण पेटले असून आता मांजराचे पाणी पेटले असल्याची चर्चा आहे.

आमदारांना उशिरा सुचलेले शहाणपण !


"एकदा पालकमंत्र्यानी जलपूजन केल्या नंतर पुन्हा आमदारांनी जलपूजन करणे हे संयुक्तिक नाही आणि हे जलपूजन म्हणचे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे म्हणाले. 

"सदर प्रकल्प हा केज मतदार संघात असल्याने आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते धनेगाव येथे मांजरा धरणावर जलपूजन करण्यात येणार असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार म्हणाले. 

" आज आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते होणाऱ्या जलपूजन कार्यक्रमा विषयी अधिकृत माहिती नाही परंतु आम्ही कुणालाही रोखणार नाही. असे मांजरा प्रकल्पाचे शाखा अभियंता शाहूराज पाटील म्हणाले. 

No comments