Breaking News

तुमचे प्रेमच दादांसाठी शुभेच्छा भेटण्याचा आग्रह नको

 

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शिवछत्र परिवाराकडून आवाहनगेवराई :  शिवछत्र परिवाराचे आधारस्तंभ आणि गेवराई विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी ८४ वा वाढदिवस आहे. आई तुळजाभवानीची कृपा आणि सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद यामुळे दादांची  प्रकृती उत्तम असून आजही तरुणांना लाजवेल असा उत्साह दादांकडे आहे. दादा आणि शिवछत्र परिवारावर प्रेम करणार्या बीड जिल्ह्यातील सर्व चाहत्यांचे प्रेम याच दादांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर कोणीही त्यांना भेटण्याचा आग्रह धरू नये, दादांच्याप्रती आपणा सर्वांच्या सदिच्छा, प्रार्थना आणि प्रेम त्यांचा उत्साह वाढवेल मात्र प्रत्यक्ष भेटीचा आग्रह नकोच असे आवाहन वाढदिवसाच्या पार्श्‍वभुमीवर शिवछत्र परिवाराकडून करण्यात आले आहे.

 

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्म पितामह, गेवराई विधानसभा मतदार संघाच्या विकासाचे शिल्पकार माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांचा शनिवार, दि.१० ऑक्टोबर रोजी ८४ वा वाढदिवस आहे. दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. जयभवानी सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, सुतगिरणी यांसह गेवराई तालुक्यात सिंचन, कृषी, दळणवळण यांसह इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी भरीव विकासाची कामे केलेली आहेत. सर्वसामान्य गोरगरीबांच्या उध्दारासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी केले. सुमारे पन्नास वर्षे सातत्याने सक्रीय राजकारणात विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या राजकीय प्रवासात खर्या अर्थाने गेवराई तालुक्याचा विकास झालेला आहे. त्यामुळे त्यांचावर मनापासून प्रेम करणार्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

यावर्षी कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभुमीवर माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित कोणालाही भेटणार नाहीत आणि कोणीही भेटीचा आग्रह करू नये हे सांगताना शिवछत्र परिवाराने केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, तुमचे प्रेमच दादांसाठी शुभेच्छा आहेत. आपआपल्या घरी राहून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करून सदिच्छा व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवशारदा मल्टिस्टेटच्यावतीने श्री क्षेत्र नारायणगड येथे २५ केशर आंब्याच्या कलमांचे वृक्षारोपन केले जाणार असून श्री क्षेत्र त्वरीतादेवी मंदिर परिसर तलवाडा येथे वृक्षारोपन करण्यात येणार आहे. 

 


No comments