Breaking News

पंकजाताई मुंडे यांच्यावर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलन छेडू - विष्णू घुले

 गौतम बचुटे । केज  

समस्त महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावरगाव येथील भगवान-भक्ती गडावर रितसर परवानगी घेऊन दर्शनासाठी गेलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह कांही जणांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले. सदरील कृती ही राजकीय द्वेषातून झाली असून गुन्हे तात्काळ मागे घ्या. अन्यथा भक्ती गडाचे अनुयायी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा भाजपचे युवा नेते विष्णू घुले यांनी दिला आहे.

सावरगाव येथे उभारण्यात आलेल्या भगवान-भक्ती गडाचे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो अनुयायी आहेत. पंकजा मुंडे व भक्ती गडावर प्रेम करणारे लाखो लोक दसरा मेळाव्याला भक्ती गडावर दर्शनासाठी जात असतात. मात्र या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे स्वतः पंकजा मुंडे यांनी या वर्षीचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असून सर्वांना गडावर गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. मात्र पंकजा मुंडे गडावर गेल्यानंतर कांही कार्यकर्ते गडावर पोहोचले. दरम्यान कांही मोजक्या कार्यकर्त्यांसह दर्शनाला जाण्याची रीतसर परवानगी घेऊन पंकजा मुंडे तिथे पोहोचल्या. 

मात्र विरोधकांनी याचे राजकारण करून पंकजा मुंडे यांच्यासह अन्य कांही लोकांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. सदरील कृती ही केवळ राजकीय द्वेषातून झाली असून विनाकारण दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या. अन्यथा लाखो अनुयायी संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडतील. असा इशारा भाजपचे युवानेते तथा सरपंच विष्णू घुले यांनी दिला आहे.
No comments