Breaking News

साहिल दबडगावकर याचा सत्कार

 


बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

साहिल सत्यंद्र दबडगावकर याचा निट परीक्षेमध्ये अतिशय उत्कृष्ट असे  676 मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल सोमवारी सत्कार करण्यात आला. 

 

सत्कार प्रसंगी बोलताना भाजपा सहकार सेलचे प्रदेश सहसंयोजक डॉ.प्रशांत पाटील यांनी साहिल याचे अभिनंदन करून त्यास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व साहिलचे आई व वडील हे सुद्धा अभिनंदनास पात्र असल्याचे सांगून ते म्हणाले की अंगात जिद्द, चिकाटी असेल व प्रयत्नात सातत्य असेल तर कितीही अवघड परीक्षा असली तरी यश हमखास मिळते, तसेच याप्रसंगी बोलताना नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी म्हणाले की ध्येय निश्चित असेल व अंगी प्रामाणिकपणा असेल तर निश्चित यश मिळते त्यांनीही साहिल याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी  डॉ.स्वानंद कुलकर्णी, बी.एस.देशपांडे, दामोदर संधिकर भाजपा सोशलमीडिया जिल्हा संयोजक दत्ता महाजन, राजेश देशपांडे सर, निरंजन वाघमारे सर, आनंद कुलकर्णी सर, कमलाकर देशमुख, कैलास जोशी, राघवेंद्र शिर्षीकर सर,  उदय पाटील व मित्रमंडळ उपस्थित होते.

 या सत्कार कार्यक्रमानंतर साहिल दबडगावकर याने सर्वांचे आभार मानून यानंतर ही असाच अभ्यास करून मोठा डॉक्टर होऊन माजलगाव मधील सर्वसामान्य जनतेची सेवाकरण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.No comments