Breaking News

स्मशान भूमीवरील अतिक्रमण हटवून त्याची नोंद घ्या -- वंचित आघाडीचे तहसीलदारांना निवेदन


गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील भालगांव येथील मागासवर्गीय समाजाच्या स्मशान भूमि वरील अतिक्रमण हटवून त्याची नोंद महसुली अभिलेख याला घेण्याची निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील भालगाव या गावाचे पुनर्वसन झालेले असून मागासवर्गीय लोकांच्याव स्मशानभूमी साठी सर्वे नंबर ४५ मधील ८१ आर एवढे क्षेत्र हे स्मशान भूमीसाठी राखीव ठेवलेले आहे. मात्र त्याची महसुली अभिलेख्याला त्याची नोंद घेतली गेलेली नाही. त्यामुळे या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झालेले आहे.

या बाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिलेले आहेत. तसेच या संबंधी ग्रामपंचायतीने देखील ग्रामसभेत ठराव घेतलेला असून अद्याप त्याची महसुली अभिलेख याला नोंद झालेली नाही.  शासकीय पातळीवरून दखल घेतली गेलेली नाही.

सदर प्रकरणी कार्यवाही करून स्मशान भूमीची नोंद महसुली अभिलेख्याला घेण्याची मागणी केली आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, अनिल डोंगरे, सुमेध शिरसट, बाबासाहेब मस्के, अक्षय गोरेगावकर, अजय भांगे, धनराज सोनवणे, बाबा मस्के, उत्तम वाघमारे, गौतम बचुटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जरा स्मशानभूमीची नोंद झाली नाही; तर आम्ही प्रेतावर अंतिम संस्कार न करता प्रेत कार्यालयाच्या दारात ठेवू असा इशारा यापूर्वी २०१८ रोजी दिलेल्या निवेदनात नागरिकांनी दिलेला होता. या मुळे अधिकारी काय कार्यालयाच्या दारात प्रेत येण्याची वाट पहात आहेत की काय !No comments