Breaking News

गाढे पिंपळगाव सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने पिककर्जाचे वाटपपरळी वैजनाथ : गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने कर्जमाफी झालेल्या २०० च्या वर शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप जिल्हा बँकेचे संचालक युवानेते शरद राडकर व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग गंगणे यांचे हस्ते चेकव एटीएम देऊन  करण्यात आले.                 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यामुळे सेवा सहकारी सोसायटीचे थकीत असणारे सर्व खाते पुर्वरत सुरू करण्यात आल्याने बीड जिल्हा बँकेच्या वतीने सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सभासद असलेल्या व कोणत्याही बँकेचे कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांना सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने पिककर्जाचे वाटप करण्यात आले.

 शुक्रवारी (ता.१६) गाढे पिंपळगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पिककर्जाचे धनादेश व बँकेच्या वतीने एटीएम चे वाटप चेअरमन पांडुरंग गंगणे, जिल्हा बँकेचे संचालक युवानेते शरद राडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक व सभासद उपस्थित होते.No comments