Breaking News

आसुडाचा वापर करुन शेतकर्यांचे प्रश्न सोडवणार-पंकजाताई मुंडे

भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतिने आसुड देवुन स्वागत परळी वैजनाथ : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत गांभिर्य राहिलेले नाही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत दिली नाही तर शेतकर्यांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी आसुडाचा वापर करणार असल्याचे भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगीतले.भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या संपर्क कार्यालयात आसुड देवुन स्वागत करण्यात आले.

  भारतीय जनता पाक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून नियुक्त झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे जिल्ह्यात तसेच परळी वैद्यनाथ येथे आगमन झाले. दरम्यान भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या संपर्क कार्यालय येथे हे फटाक्यांची आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी पंकजाताई मुंडे यांचा आसुड देवुन हृदय सत्कार केला.

  मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केल्यानंतर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात आल्या.भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे औरंगाबाद पासून ते परळी पर्यंतच्या प्रवासा दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले.पंकजाताई मुंडे या शहरांमध्ये दाखल होतात ठिकाणी स्वागत करण्यात आले.कोण आली रे, कोण आली,महाराष्ट्राची वाघिण आली'च्या  घोषणेने सारा आसमंत दुमदुमला होता. रात्री शहरांमध्ये दाखल झाल्यानंतर प्रथम त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतले त्यांनी इटके कॉर्नर येथील भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ साठे यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली असता फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले तसेच फुलांचा वर्षाव करण्यात आला दरम्यान  कार्यकर्त्यांची आपुलकीने विचारपूस करताना पंकजाताईंनी संवाद  साधला.निळकंठ चाटे यांनी पंकजाताई यांच्या हाती आसुड दिल्यानंतर आपण हा आसुड शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार विरोधात वापरुन सरकारला जागे करु असे सांगितले.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे बीड सह सर्व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होत.


No comments