Breaking News

वायसीएमची धनोरा येथील महाविद्यालयास बी. ए. मराठी अभ्यासक्रमास मान्यता

शेख कासम । कडा        

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे शैक्षणिक वर्ष 2020-2021 या वर्षासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापिठाच्या पर्व तयारी अभ्यासक्रम व बी. ए. (मराठी) अभ्यासक्रम चालू करण्यास नुकतीच परवाणगी मिळाली आहे. अशी माहिती  धानोरा महाविद्यालयाचे केंद्र संयोजक  डाॅ. रमेश खिळदकर यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी.आ.भिमराव धोंडे व युवा नेते अजय धोंडे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी धानोरा ता.आष्टी जि. बीड. येथील निसर्गरम्य अशा महाविद्यालया मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी, तसेच व्यवसाय, करत या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी थांबलेले असतात करीता त्यांना मुक्त विद्यापीठ मधून शिक्षण घेता यावे म्हणून येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र  मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाची पूर्व तयारी बी. ए. अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष.2020-2021 करीता प्रवेश देणे चालू केले असून याचा इच्छूक विद्यार्थ्यांने धानोरा येथील महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख प्राचार्य डाॅ.कैलास वायभासे तसेच केंद्र संयोजक डाॅ.रमेश खिळदकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.  


No comments