Breaking News

येडेश्वरी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

गौतम बचुटे । केज  

येडेश्वरी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या वर्षाचा ७ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता येडेश्वरी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते झाला. कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी श्री. तुकाराम वटाणे यांनी बॉयलरचे सपत्नीक विधिवत पूजन केले. 

 

या कार्यक्रमास जेष्ठ नेते बाळासाहेब बोराडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष  नंदकुमार मोराळे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, खरेदी विक्री संघाचे संचालक विलास जोगदंड, अशोक तारळकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी चौधरी,दत्तात्रय ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी,प्रेमचंद कोकाटे व आदी मान्यवर उपस्थित होते.

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य लेखापाल श्री.अशोक लांडगे यांनी केले तर शिवाजी चौधरी, विलास जोगदंड यांनी सर्व अधिकारी, कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 अध्यक्षीय समारोपामध्ये बोलताना सोनवणे म्हणाले कि, या वर्षी पाऊस समाधारक झाला असून मांजरा धरणात ६५% पाणी साठा झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी उसाचे प्रमाण आणखीच वाढणार आहे. सध्या आपल्या कारखान्याच्या क्षमतेपेक्षा दीडपट ऊस कारखान्याला उपलब्ध आहे. निसर्गाच्या दृष्टीने जरी चांगला विषय असला तरी देशात साखरेचे प्रचंड उत्पन्न वाढत असल्यामुळे साखतेला चांगले दिवस नाहीत अशी खंत व्यक्त केली.  ज्या वेळीस कारखाना उभारणी करीत असताना शेतक-यांना न्याय मिळावा, शेतक-यांच्या चेह-यावर नव चैतन्य यावे असे स्वप्न उराशी बाळगून कारखान्याची उभारणी केली.  

तसेच बजरंगबप्पा सोनवणे यांनी कर्मचारी वर्गाला ६ टक्के बोनस या दिवाळीला देणार तसेच येथून पुढे कर्मचा-यांचा पगार १ ते १५ तारखेच्या आतच होईल अशी गोड बातमी दिली. त्याच पद्धतीने कर्मचारी वर्गाच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक विभागाला महिन्यातील शनिवार दिला आहे त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याची समस्या सोडवता येतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरूण चव्हाण यांनी मानले.


No comments