Breaking News

झिंगाभोई मत्स व्यवसाय सह संस्थेने १४ लाख बोटुकली मत्स व झिंगा बिज माजलगाव धरणात केली साठवणूक

 


बाळासाहेब आडागळे । माजलगाव     येथील माजलगाव धरणाचा ठेका झिंगाभोई मत्सव्यवसाय सह संस्था म.सावरगाव या संस्थेला २०२० ते २०२५ पंर्यतचा ठेक मिळाला असुन दि २३ आँक्टो शुक्रवार रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणात ११ लाख बोटुकली मत्स बीज व ०३ लाख गुजराती झिंगा बीज सोडून साठवणूक केली आहे.

झिंगाभोई मत्स व्यवसाय सह संस्था म.सावरगाव या संस्थेला पुढील पाच वर्षासाठी मत्स पालनाचा ठेका भेटला असुन दि २२ आँक्टो शुक्रवार रोजी जवळपास १४ लाख मत्स बोटुकली व झिंगा बिज साठवणूक कार्यक्रम २०२०-२०२१ आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमास जि.प.सदस्या मंगलाताई सोळंके, विरेंद्र सोळंके, साह्यक आयुक्त मत्सव्यवसाय हं. रा. बिरादार, कचरु तात्या खळगे, सरपंच आंकुश राठोड,आंकुश बलैय्या अरुण लिंबोरे यांच्या उपस्थितीत माजलगाव धरणात झिंगाभोई मत्सव्यवसाय सह संस्थेने जवळपास ११ लाख मत्स बोटकुली बीज व ०३ लाख गुजराती झिंगा बिजाची साठवणूक करण्यात आली, यावेळी झिंगाभोई संस्थेचे चेअरमन ज्ञानोबा कचरे,सचिव उत्तमराव घटे,उषाताई कचरे यांची उपस्थिती होती.

 २५ वर्षानंतर मच्छीमारांना न्याय मिळाला


माजलगाव जलाशयाचा ठेका हा नेहमी वादग्रस्त असायचा,यातुन ठेकेदार ल मच्छीमारांचा वाद विकोपाला जाऊन मच्छीमार बांधवावर गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु मच्छीमारा बांधवानी २५ वर्षे संघर्ष केल्यानंतर पहिल्यांदाच मच्छीमार बांधवांची संस्था असलेल्या झिंगाभोई मत्सव्यवसाय सह संस्थेला पुढील पाच वर्षासाठी ठेका मिळाला. नारायण कचरे ( संस्थापक अध्यक्ष, झिंगाभोई मत्सव्यवसाय स.सं.म.सावरगाव)
No comments