Breaking News

तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनासह वैयक्तिक स्तरावर प्रयत्नशील - धनंजय मुंडे


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत बिझनेस ऑन व्हील्स उपक्रमाचे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन

अजित पवार -धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहातील स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

परळी  : परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील तरुण युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस ऑन व्हील्स या उपक्रमाद्वारे तरुणाना उद्योगासाठी लागणारे वाहन घ्यायला अर्थसहाय्य देत आहोत. राज्य सरकार व गरज पडल्यास वैयक्तिक स्तरावर मदत उपलब्ध करून देऊन युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

परळी येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत बिझनेस ऑन व्हील्स उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी आयोजित नाव नोंदणी शिबिराचे फित कापून उदघाटन ना. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परळी मतदारसंघासाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन, कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन 'माझा व्यवसाय माझा हक्क' या सदराखाली करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत भाजीपाला फळे विक्री,  चाट भंडार,कृषी विषयक वाहतूक, वडापाव विक्री, आईस्क्रीम विक्री, बिर्याणी व्यवसाय ,इडली डोसा उत्तपा व्यवसायिक, फिरते साहित्य विक्री, यासह आपल्या आवडीच्या विविध व्यवसायांसाठी लागणाऱ्या वाहनांची उपलब्धता करून देण्यात येणार असून या वाहनांसाठी कर्ज व सबसिडी असा अर्थिक आधार देण्यात येणार आहे. 

या अतिशय महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि.११ते२५ या कालावधीत असणार आहे.


सर्वसामान्यांसाठी या योजनेची लाभ वयोमर्यादा वय वर्षे १८ ते ४५ असून अनुसूचित जातीतील व्यक्तींसाठी ती वय वर्षे १८ ते ५० इतकी आहे.

या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्या सह आ. संजय दौड, गोविंद देशमुख, गटनेते अजय मुंडे, मधुकर आघाव, संतोष शिंदे, के डी उपाडे, नगराध्यकक्षा सरोजिनीकाकू हलगे, जाबेर खान पठाण, दीपकनाना देशमुख, शरद मुंडे, अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवीताई भोईटे,  रमेश भोईटे, सुरेश अण्णा टाक, बाशीदभाई,  वैजनाथ सोळंके,  वैजनाथ बागवले,  किशोर पारधे, अय्युब पठाण, शंकर आडेपवार, शरीफ भाई, विजय भोयटे, जयराज देशमुख, गोपाळ आंधळे, महादेव रोडे, संजय फड, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, ताज खान पठाण,  चेतन सौंदळे, विनोद जगतकर, बीड राष्ट्रवादी वि. कॉ. जिल्हासरचिटणीस स्वप्निल मुंडे,  रामेश्वर महाराज कोकाटे, शहराध्यक्ष सय्यद सिराज, ऍड मंजित सुगरे, अजय जोशी, अल्ताफ पठाण, मुक्तारभाई , अमर रोडे, बळीराम नागरगोजे, ज्ञानेश्वर होळंबे, प्रा. अतुल फड, मेहबूब शेख, महेंद्र रोडे, परीक्षण कृष्णा बळवंत, कुमार पुराणिक, संजय सुरवसे, महेश परळीकर, लक्ष्मण वाकडे, शँकर कापसे, यांसह आदी उपस्थित होते. 

यावेळी ना. अजितदादा पवार व ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या सेवा सप्ताह या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ना. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. यावेळी प्रा. मधुकर आघाव, जिल्हा उद्योग केंद्राचे तांदळे, पवार यांच्यासह आ. संजय दौंड यांनीही आपले विचार व्यक्त केले.No comments