Breaking News

नीट परिक्षेत योगेश्वरी बोंबीलवारचे सुयश


परळी : 
नीट परिक्षेत परळी येथील विद्यार्थीनी कु.योगेश्वरी देविदास बोंबीलवार हिने 600 गुण मिळविले असून ऑल इंडिया रॅन्कमध्ये ती 19960 क्रमांकावर असून शेड्युल्ड कास्टमध्ये तिने 378 वा क्रमांक मिळविला आहे. योगेश्वरीचे आई वडिल मजुरी करीत असून या दोघांच्या कष्टाचे चीज योगेश्वरीने केले आहे. 

राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नीट परिक्षेत परळीची विद्यार्थीनी कु.योगेश्वरी बोंबीलवार हिने मोठे यश मिळविले आहे. तिने 600 गुण मिळविले आहेत. न्यू हायस्कुलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर लातूरच्या शाहु महाविद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले आहे. योगेश्वरीची बहिण तेजस्विनी बी.टेक (इलेक्ट्रीक) असून भाऊ बी.टेक आहे. आपल्या तिन्ही मुलांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेले यश कौतुकाचे असून मुलांनी आपले नाव मोठे केले आहे अशी प्रतिक्रिया योगेश्वरीच्या आई वडिंलांनी दिली.


No comments