Breaking News

बीडकरांना नाहक त्रास देणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा - सुदर्शन धांडे


बीड : येथील जनतेला पाण्यापावसाच्या दिवसात रस्ते काम अडवून दिला जाणारा त्रास जीवघेणा ठरत आहे. हा बीडकरांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून याला जबाबदार असणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी उपोषणस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातला संताप वणव्याचे रूप घेईल तेव्हा थोपवणे अशक्य होईल असाही इशारा प्रशासनाला दिला आहे.

       

नगरपरिषद, बीडच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांचे प्रचंड हाल होत आहेत, शहरातील पिंपरगव्हाण रोड, हिरालाल चौक, मोंढा रोड, शाहूनगर या भागातील रस्त्यांच्या कामांना बोगसगिरीचे नाव देऊन जाणीवपूर्वक थांबवले गेले आहे. हे सर्व काहीतरी मिळवण्यासाठीचे भांडणे बीडकरांच्या जीवावर उठत आहेत, बीडकरांचे जगणे मुशकील झाले आहे. रस्त्याचे काम सुरु करायचे सोडून पत्रकबाजी करत शहरातील नागरिकांना मिसगाईड करण्याचे काम क्षीरसागरांनी सुरु केले आहे. अन त्यात भर पडत आहे ती नगरपरिषदेच्या निगरगट्ट मुख्याधिकाऱ्यांची, नागरिकांच्या त्रासाला जबाबदार धरून मुख्याधिकारी श्री गुट्टे यांना निलंबित करा व अशी मागणी बीडकरांना नाहक त्रास देणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करा शिवसंग्राम प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी केलेली आहे.No comments