Breaking News

न्यायालयाच्या ईमारतीच्या विद्युती करणासाठी वकील संघाची पालकमंत्र्याकडे मागणी

गौतम बचुटे । केज  

येथील न्यायालयाच्या नवीन ईमारतीच्या विद्युतीकरणासाठी आलेला निधी हा कोव्हीडच्या साथीमुळे विहित कालावधीत खर्च न झाल्यामुळे तो परत गेला. तो परत गेलेला निधी प्राप्त होण्यासाठी वकील संघाने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, केज येथील प्रस्तावीत अप्पर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. तसेच आतील फर्नीचरचे काम प्रगती पथावर आहे. या नूतन न्यायालयाच्या ईमारतीमधील लाईट फिटींग करीता आलेले ५४ लाख रु.चा निधी हा कोरोनाच्या साथरोगामुळे व लॉकडाउनमुळे राष्ट्रीय आपत्तीत ३१ मार्च ३१ मार्च पर्यंत खर्च न झाल्यामुळे हा निधी शासनाकडे परत गेलेला आहे. त्या मुळे प्रस्तावीत न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या लाईट फिटींगसाठीचा परत गेलेला निधी पुन्हा परत मिळण्या करीता सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मदत करावी आणि लाईट फिटिंगचे काम पूर्ण करावे. अशी मागणी केज वकील संघाचे अध्यक्ष अँड. एस वाय मुंडे, यांच्यासह सचिव अँड. व्ही. बी. गायकवाड, अँड. शाहू तुपारे, अँड. आर. एस. कुलकर्णी यांच्यासह केज न्यायालयातील वकिलांनी केली आहे.


No comments