Breaking News

माजलगांव नगर परिषद बरखास्त करा -शेख रशिद

 माजलगांव :  करोडो चा घोटाळा करून लोकांना चूना लावयच काम लोकप्रतिनिधी करत आहेत.पूर्ण महाराष्ट्रात माजलगांव नगरपालिका गाजवले असतांना नगरसेवक आता नविन नगराध्यक्ष बनवण्याचं प्रयत्न करत आहे पण कचरा, नाल्या, रस्ते अशातरी जनतेच्या मुलभुत समस्या समोर असून सूध्दा नगरसेवकांनो  राजकारणच करत आहेत.

माजलगांव  जनतेने आता समोर यायला पाहिजे. अपंग ,घरकूल, टमरेल अश्या  वेगवेगळ्या अंदोलन करुनही लोकप्रतिनिधी काहीही फरक पडत नाहीत हयासाठी आता जनअंदोलनची गरज आहे .माजलगांव जनतेने आता रस्त्यावर उतरून माजलगांव नगरपरिषद बरखास्त करून निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिध्द पञकात केली आहे.


No comments