Breaking News

जागतिक पोलिओ दिनानिमित्त वडवणीत रोटरी क्लबच्या वतीने कार रॅली


जगदीश गोरे । वडवणी

२४ ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यानिमित्त शनिवारी सकाळी रोटरी क्लब ऑफ वडवणी यांच्या वतीने कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलिओ या आजाराचे संपूर्ण जगातून समूळ उच्चाटन करणे व या आजाराबद्दल समाजामध्ये जागरूकता आणणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट रोटरी क्लबने डोळ्यासमोर ठेवून जगभरात मोहीम हाती घेतलेली आहे. शनिवारी  सकाळी नऊ वाजता आनंद मंगल कार्यालय येथून कार रॅली चालू झाली. शहरातील सर्व चौका-चौकात पोलिओ निर्मूलन बद्दल स्पिकरद्वारे जनजागृती करत साडेनऊ  वाजेपर्यंत रेणुका माता मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. जगातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये लहान मुलांना दोन थेंब डोसचे दिले जातात. हे करण्यात रोटरी क्लबचा सिंहाचा वाटा आहे.

 या रॅलीचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर जगदीश टकले व चंद्रकांत करांडे हे होते. या रॅलीत संस्थापक चेअरमन डाॅ.भाऊसाहेब पुर्भे, विद्यमान अध्यक्ष डॉ. विजयकुमार निपटे, सेक्रेटरी माधव पुरी, अॅड.श्रीराम लंगे, जेष्ठ पञकार सुभाषराव वाव्हळ, अशोक निपटे, अनिल वाघमारे, महेश मुंडे, डाॅ. दिनकर बोंगाने, डाॅ.  जगदीश टकले, भंडारे, तात्या शिंदे, वचिष्ठ शेंडगे, चंद्रकांत करांडे, डाॅ. थोटे, दुटाळ महाराज, नवले, डाॅ. रविंद्र मुंडे, संतोष गोंडे, आदी रोटरी क्लब वडवणीचे सर्व  सदस्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.


No comments