Breaking News

विद्यार्थ्यांचा पोकळ पुळका आत्ताच का? - अजय सुरवसे

 बीड : कोरोना महामारीमुळे सर्व काही बंद करण्याचे आदेश सहा महिन्यांपूर्वी केंद्रातील भाजपा सरकारनं दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी सरकारने लोकहितासाठी त्याची अंमलबजावणी केली. आज विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकार व युजीसी पूर्णपणे सक्षम असून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भक्त करत असल्याचं दिसत आहे. आगामी काळात विद्यापीठाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा आताच पोकळ पुळका दाखवला जात असल्याचे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते तथा आमदार संदीप क्षीरसागरांचे कट्टर समर्थक अजय सुरवसे यांनी प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केलाय.

गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत उठ सूट महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची संधी विरोधक शोधत आहेत. मात्र दरवेळेस सुजाण जनते समोर ते  तोंडघशी पडत आहेत. केंद्रातील भाजपा सरकारने कोरोनाहाराष्ट्रातील महामारीमुळे देश सहा महिने लॉकडाऊन करण्याचं फर्मान सोडलं होत. तशा सुचना देशातील राज्य सरकारांना दिल्या होत्या. टाळे बंदीच्या काळात देशातील जनतेला आवाहन करून थाळ्या घंटी वाजवण्यास व मेणबत्या पेटवण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यासाठी चढाओढ करून भक्त  घंटा वाजवीत होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्यात सरकारने आपापल्या परीने परिस्थिती हताळावी असे निर्देश ही केंद्राकडून देण्यात आले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य अबाधित रहावे. यासाठी प्रयत्नरत आहे. त्यातच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आरोग्य ही अबाधित रहावे, यासाठी या आरोग्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. कुठल्याही प्रसिद्धी साठी नव्हे तर कोरोना सारखे भयंकर महामारी पासून विदयार्थी यांना वाचविण्यासाठी परीक्षा नकोत ही राज्य शासनाची भूमिका होती. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी विरोधक मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या म्हणून  राज्यपाल यांच्या कार्यालयाची उंबरठे झिजवत होते.  विद्यार्थ्यांच्या विद्यापीठामार्फत परीक्षा घेण्याचे जाहीर झाले असून वेळापत्रक ही देण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षेत विदयार्थी इंटरनेट, फोन कुठल्याही कारणाने डिस्कनेक्ट झाला तर त्याला परत परीक्षा वेळेत देता येते असे ही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. परंतु पदवीधर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करून आपली पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींनी चालविला असल्याचा आरोप श्री.  सुरवसे यांनी  केला आहे. मात्र त्यांच्या या पोकळ गप्पांना विद्यार्थी भीक घालणार नाहीत. असेही त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

No comments