Breaking News

सरकार व कारखानदारांनी आ.सुरेश धस यांच्यावर सुडबुद्धीने गुन्हे दाखल केले - तात्यासाहेब हुलेके. के. निकाळजे । आष्टी 

महाराष्ट्रातल्या ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार यांना साखर कारखान्यांनी भाव वाढ द्यावी व ईतर मागण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली 9 संघटणांनी कोयता बंदचा संप पुकारला असल्यामुळे सरकार व कारखानदार यांनी आ.सुरेश धस यांना टारगेट केले असुन सुडबुध्दीने ते फक्त ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार यांच्या मागण्यासाठी झगडतात म्हणुनच त्यांच्या वर चार चार गुन्हे दाखल करण्यात आले असुन आ.धस यांच्या वर गुन्हे दाखल केलेल्या सरकारचा व कारखानदाराचा ऊसतोड मजुर संघटना निषेध करत असुन आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोयता बंदच राहणार असून संप मागे घेणार नसल्याची माहिती  ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब हुले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्रातील ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार यांच्या भाव वाढ व ईतर मागण्यासाठी कोयता बंद संप पुकारला असुन महाराष्ट्रातील ९ ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार या संघटनांनी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली हा संप चालु असुन भाव वाढ व ईतर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत कोयता बंदसाठी आ. सुरेश धस यांनी दिनांक २४/९/२०२० ते ५/१०/२०२० असा अकरा दिवस महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यातील पस्तीस तालुक्याचा दौरा केला.यामुळे सरकार व कारखानदार घाबरले असुन त्यांनी सुड बुध्दीने आकसापोटी आ.सुरेश धस यांच्या वर पोलीसात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.याचे उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील खेड येथे कोरोनाच्या नावाखाली ऊसतोड मजुरांना पोलीसांनी मारहान केली.अशावेळी आ.सुरेश धस यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या मजुरांच्या पाठीशी उभे राहत त्यांना धीर देण्याचे काम केले.अशा परिस्थीतीत वास्तविक पाहता जिल्हाबंदीचा गुन्हा हा अहमदनगर येथे दाखल होणे क्रमप्राप्त होते माञ तसे न होता आ.सुरेश धस यांच्यावर तत्कालीन बीडचे पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी आष्टी पोलीसांत गुन्हा दाखल केला.लोकशाही म्हणवणा-या भारतात कोणावरही अशा पद्धतीने कायद्याचा दुरुपयोग होणे अपेक्षित नव्हते माञ ते आ.धस यांच्या बाबतीत झाले.शिवाय ऊसतोड मजुर मुकादमांचे आष्टी-पाटोदा-शिरुर येथे मेळावे आ.सुरेश धस यांनी घेतले त्यानंतरही इतर नेत्यांनी मेळावै घेतले माञ त्यावेळी देखील आ.धस यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हणजे महाराष्ट्रात ऊसतोड मजुर मुकादमांची बाजू मांडणार स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबानंतरच नेतृत्व तयार होतय त्यामुळे त्या नेतृत्वाची गळचेपी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून हि कारखानदारांची मक्तेदारी असणार सरकार करत असल्याचा आरोपही तात्यासाहेब हुले यांनी केला. त्यामुळे असल्या सुडबुध्दीने वागणाऱ्या सरकारचा व कारखानदारांचा महाराष्ट्रातील ९ ऊसतोड मजुर,मुकादम व वाहतुकदार संघटना निषेध करत असुन आम्ही आ.सुरेश धस यांच्या पाठीमागे खंबीरपणे ऊभे आहोत असेही तात्यासाहेब हुले यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.No comments